Yuzvendra Chahal दिल्ली : युजवेंद्र चहलच्या फिरकीच्या जादूने पंजाब किंग्जने कमी धावसंख्येच्या थरारक सामन्यात कोलकाता नाईटरायडर्सला १६ धावांनी मात दिली. चहलने आपल्या चार ओव्हरच्या स्पेलमध्ये केवळ २८ धावा देत ४ बळी घेतले आणि सामन्याचे चित्रच पालटले. Yuzvendra Chahal
११२ धावांच्या लहान लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरची संपूर्ण संघ फक्त १५.१ ओव्हरमध्ये ९५ धावांवर गारद झाला. चहलच्या या शानदार कामगिरीनंतर जेव्हा तो मैदानातून परतत होता, तेव्हा पंजाब किंग्जच्या मालकीण प्रीती झिंटाने त्याला मिठी मारून अभिनंदन केले. प्रीती झिंटा चहलच्या कामगिरीने अत्यंत प्रभावित झाल्या होत्या आणि त्यांचा तो भावनिक क्षण चाहत्यांनाही खूप भावला. Yuzvendra Chahal
Yuzvendra Chahal पंजाब परतला विजयपथावर:
सनरायझर्स हैदराबादकडून मिळालेल्या ८ विकेट्सच्या हारीनंतर पंजाबसाठी ही लढत अत्यंत महत्त्वाची होती. त्या सामन्यात पंजाबने २४५ धावांचा डोंगर रचला होता, पण गोलंदाज तो बचाव करू शकले नव्हते. त्यामुळे केकेआरविरुद्ध विजय अत्यावश्यक होता. Yuzvendra Chahal
तरीही, केवळ १११ धावांवर ऑलआउट झाल्यामुळे पुन्हा एकदा पराभवाची भीती होती. पण गोलंदाजांनी कमाल केली आणि १६ धावांनी सामना जिंकला. Yuzvendra Chahal
पॉइंट्स टेबलमधील स्थिती:
६ पैकी ४ सामने जिंकून पंजाब किंग्जने आता गुजरात टायटन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यानंतर चौथा क्रमांक मिळवला आहे. Yuzvendra Chahal
हे पण वाचा :- Cars Discount Update 2025