Uddhav Thackeray News: “वेळ आल्यास मी एकटं लढण्याचा निर्णय घेईन,” अशी खळबळजनक घोषणा शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील एका जाहीर सभेत केली आहे. या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः इंडिया आघाडीत यामुळे अस्वस्थता निर्माण झाली आहे.
महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर शिवसेना (UBT) कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढली होती. अनेक शिवसैनिकांनी मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळावर उतरण्याची मागणी वारंवार व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा करून कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेतल्याचे संकेत दिले आहेत. Uddhav Thackeray News
त्यांच्या या विधानाने आगामी निवडणुकांच्या संदर्भात शिवसेनेच्या (UBT) भूमिकेबाबत चर्चेला उधाण आलं आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता वाढत असल्याने राजकीय समीकरणांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
Uddhav Thackeray News: उद्धव ठाकरे “गद्दारांना महाराष्ट्रात थारा नाही, सूड उगवणारच!”

“आज माझ्याकडे काहीच नाही. कोणासाठी आणि कशासाठी लढू? दुसरा कुणी असता तर कदाचित खाली बसला असता, पण मी तसा नाही. मी हिंमत हारणारा नाही, मैदान सोडणारा नाही. जिंकेपर्यंत लढत राहीन. गद्दारांच्या हातून तर कधीच हार मानणार नाही,” असे ठाम वक्तव्य शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील जाहीर सभेत केले. त्यांच्या या घोषणेमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
ठाकरे पुढे म्हणाले, “मी पुन्हा जिद्दीने उभा आहे. आज जो संघर्ष करतोय, तो तुमच्यासाठी आहे. माझी ताकद तुम्ही आहात, माझा विश्वास तुमच्यावर आहे. विरोधकांनी विकत घेतलेली माणसं दाखवली, पण वामनराव महाडिकांच्या शब्दांत सांगायचं तर, विकली जाते ती विष्ठा, निष्ठा मात्र माझ्यासोबत उभी आहे.” Uddhav Thackeray News
महापालिका निवडणुका जवळ आल्याची आठवण करून देत उद्धव ठाकरे म्हणाले, “मी मुंबई, नाशिक, संभाजीनगरच्या लोकांशी बोललो आहे. सर्वांचे मत आहे – ‘एकटं लढा.’ जर कार्यकर्त्यांची जिद्द आणि तयारी मला दिसली, तर मी कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार निर्णय घेईन. पण या वेळेला मला फक्त विजय नको, मला महाराष्ट्रावर वार करणाऱ्या गद्दारांचा सूड घ्यायचाय. ज्यांनी मराठी अस्मितेला तडा दिला, त्यांना महाराष्ट्रात थारा मिळता कामा नये.”
आपल्या लढाऊ भूमिकेचा पुनरुच्चार करत उद्धव ठाकरे म्हणाले, “आज मी अमित शाहांना एकच सांगतो – आमच्या नादी लागू नका. आजचा फक्त ट्रेलर आहे. तुमची ताकद दाखवा, तयारी दाखवा. ज्या भ्रमात राहता, त्यातून बाहेर या. एकदा माझ्या कार्यकर्त्यांची तयारी झाली की, मी निर्णय घेईन, आणि तो निर्णय पक्काच असेल.”
सभेच्या शेवटी ठाकरे म्हणाले, “मी सूडाची भाषा का करतोय, ते समजून घ्या. महाराष्ट्राला फोडणाऱ्या, मराठी माणसाला डावलणाऱ्या, आणि आपल्या मागे विश्वासघात करणाऱ्या गद्दारांना या भूमीतून हद्दपार करायचं आहे. हे फक्त माझं नव्हे, तर प्रत्येक शिवसैनिकाचं स्वप्न आहे.”
ठाकरे यांच्या या जळजळीत भाषणाने शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारलं असून, राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.Uddhav Thackeray News
हे पण वाचा :Railway Job 2025: रेल्वेत नोकरीची मोठी संधी! ३२००० हून जास्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, असा करा अर्ज