Ayushman Card Free Treatment 10 Lakh : महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! मिळणार 10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार – 3.45 कोटींहून अधिक लोकांना होणार थेट फायदा.

Atharv Satpute
4 Min Read
Ayushman Card Free Treatment 10 Lakh


Ayushman Card Free Treatment 10 Lakh: महाराष्ट्र राज्यातील नागरिकांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत आता दुप्पट करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे 3.45 कोटींहून अधिक आयुष्यमान कार्डधारकांना थेट लाभ होणार आहे.

दहा लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार

पूर्वी या योजनेत गंभीर आजारांसाठी उपचार मर्यादा 5 लाख रुपये इतकी होती. आता ही मर्यादा 10 लाख रुपये करण्यात आली आहे. हा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून, त्यामुळे कॅन्सर, हृदयविकार, मूत्रपिंडाचे आजार, मेंदूविकार अशा गंभीर आजारांवरील उपचार आर्थिक मर्यादेशिवाय करता येतील. Ayushman Card Free Treatment 10 Lakh

या योजनेअंतर्गत एकूण 2399 उपचारांचा समावेश आहे, ज्यापैकी 223 उपचार शासकीय रुग्णालयांसाठी राखीव ठेवले गेले आहेत.

आता नवीन ब्रॅंड ला सरकारने स्वतचे made in india product विकण्यास परवानगी दिली आहे. या प्रॉडक्ट मध्ये खूप healthy protein आहेत. तसेच या प्रॉडक्ट चे विक्री खूप वेगाने होत आहे. – Vedika Foods Oreder Now

जुन्या पद्धतीचा अंत – नवी दररचना लागू

आता रुग्णालयांना दिल्या जाणाऱ्या उपचार पॅकेजच्या दरामध्येही मोठा बदल करण्यात आला आहे. पूर्वी रुग्णालयांच्या श्रेणीनुसार पॅकेज दर दिले जात होते, मात्र आता ती पद्धत रद्द करण्यात आली आहे. Maharashtra Health Scheme Beneficiaries:

याऐवजी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने निश्चित केलेले दर आणि राज्य सरकारचे उपचार दर हेच बेस पॅकेज रेट म्हणून लागू केले जाणार आहेत. यावर आधारित अंगीकृत रुग्णालयांना प्रोत्साहनपर रक्कम (incentive) मिळेल. Ayushman Card Free Treatment 10 Lakh

नियामक परिषदेला अधिक अधिकार

या योजनेतील उपचार, दर, आणि आरोग्य धोरणांविषयीचे निर्णय घेण्याचे अधिकार आता नियामक परिषदेला देण्यात आले आहेत. विस्तारित आरोग्य योजनेअंतर्गत सर्व उपचारांची यादी व दर वेळोवेळी पुनरावलोकन करून बदल करता येणार आहेत.

राज्य सरकारने सचिव स्तरावर अधिकार देऊन शासकीय उपचारांची संख्या वाढवणे, दरात बदल करणे, आणि काही अपवादात्मक परिस्थितीत खासगी रुग्णालयांनाही काही उपचार खुले करण्याचे अधिकार दिले आहेत. Ayushman Card Free Treatment 10 Lakh

कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ

या योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे व्हावी यासाठी क्षेत्रीय स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आता प्रत्येक KYC पूर्ण केलेल्या कार्डासाठी 20 रुपये, तर कार्ड वितरणासाठी 10 रुपये मानधन देण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने 204 कोटी 6 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. Ayushman Card Free Treatment 10 Lakh

सध्या राज्यातील एकूण 12.74 कोटी लाभार्थ्यांपैकी 9.30 कोटी आयुष्यमान कार्ड अद्याप शिल्लक आहेत. हे उद्दिष्ट 100% पूर्ण करण्यासाठी आशा कर्मचारी, स्वस्त धान्य दुकान चालक आणि “आपले सरकार” सेवा केंद्रातील कर्मचाऱ्यांना ही वाढीव मानधन रक्कम देण्यात येणार आहे. Ayushman Card Free Treatment 10 Lakh

नागरिकांसाठी थेट फायदा

या निर्णयामुळे राज्यातील लाखो कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना यांच्या एकत्रित अंमलबजावणीमुळे गंभीर आजारांवरील उपचार पूर्णपणे मोफत आणि सुलभ होणार आहेत. Ayushman Card Free Treatment 10 Lakh

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील आरोग्य क्षेत्रात नवा टप्पा गाठला जाणार असून सर्वसामान्य जनतेला दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळणार आहेत.

Read More:- Bigg Boss 19 Breaking News: टीआरपीत नंबर 1, शो तीन आठवड्यांनी वाढणार?

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version